

आइस्क्रीम खायला गेलेल्या तरुणाला मारहाण
पिंपरी : आइस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या तरुणाला जुन्या कारणावरून चौघांनी बेदम मारहाण केली. रविवारी (ता. १) रात्री दिघीतील मॅगझीन चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी सोहम संदीप दलवी (वय २२, आदर्शनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मनोज साखरे पाटील, नितीन बुरुडे, गौरव शेवाले आणि फैजन यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी आइस्क्रीम खाण्यासाठी जेथे गेले होते तेथे पाणीपुरी विक्री करणाऱ्याचे महिन्याचे पैसे दिले नाहीत, या कारणावरून आरोपींशी त्यांचा वाद झाला. यातून फिर्यादीला यांना मारहाण झाली.
---------------------
विदेशी मद्याची तस्करी
पिंपरी ः मालकाच्या फायद्यासाठी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका हॉटेल रोखापालाला पोलिसांनी पकडले. मंगळवारी (ता. ३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निगडीतील थरमॅक्स चौक ते साने चौक मार्गावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील चौधरी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी योगेश गोवर्धन वारे (वय ३१, रा. हरगुडे वस्ती, चिखली) आणि हॉटेल मालक प्रशील शेट्टी (रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी योगेश मालकाच्या सांगण्यावरून दुचाकीवरून मद्याच्या बाटल्या घेऊन जात होता. पोलिसांनी अडवून तपासणी करून ५९ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये विदेशी मद्याच्या २७ बाटल्या आणि एका दुचाकीचा समावेश आहे.
---
मद्याची टेंपोतून बेकायदा वाहतूक
पिंपरी ः अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून मद्याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. मंगेश दयाराम नेरकर (वय ४५, रुपीनगर, तळवडे असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी (ता. २) दुपारी एक वाजेच्या सुमारास चिखलीतील कृष्णानगर बस थांब्याजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कपिलेश इगवे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीकडून ४७ हजार ९२५ रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हा माल आरोपीने निगडीतील एका वाइन शॉपमधून आणल्याचे तपासात उघड झाले.
--------
घराच्या आडोशाला गावठी दारूची विक्री
पिंपरी ः आपल्या घराच्या आडोशाला हातभट्टीची दारू बेकायदेशीररीत्या साठवून विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी (ता. ३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेरगावमधील संदीपनगर परिसरात ही कारवाई झाली. याप्रकरणी संबंधित महिलेवर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २५ लिटर गावठी दारू जप्त केली.
-------
बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी कारवाया
पिंपरी ः धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाया केल्या. निगडी, काळेवाडी आणि चिखली येथील कारवायांमध्ये अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
---