सांगवडे पुलाच्या कामाला वेग

सांगवडे पुलाच्या कामाला वेग

Published on

सोमाटणे, ता. ५ : सांगवडे येथील नवीन पुलाच्या कामाला सध्या वेग आला असला, तरी पुलाच्या बांधकामामुळे दुचाकी वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आल्याने दुचाकीस्वारांची दळणवळणाची समस्या कायम आहे.
सांगवडे-मामुर्डी दरम्यानचा लोखंडी साकव धोकादायक झाल्याने गेल्या चार दशकांपासून दोन्ही गावांतील नागरिक नवीन पुलाची मागणी करत होते. मात्र, पुलाच्या खर्चाची जबाबदारी पाटबंधारे विभाग, पीएमआरडीए किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांपैकी कोण घेणार, यावर एकमत न झाल्याने हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. दरम्यान, वर्षभरापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या पुलासाठी निधीची जबाबदारी स्वीकारत कामाला मंजुरी दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला.
नदीपात्रावरील पुलाची लांबी १४१ मीटर व रुंदी १५ मीटर आहे. नदीपात्रासह एकूण पुलाची लांबी १६६ मीटर तर रुंदी १२ मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. जोडरस्ता लोढा बाजूला ८४ मीटर लांब व १२ मीटर रुंद असून सिम्बायोसिस विद्यापीठाच्या बाजूला ७४ मीटर लांब व १२ मीटर रुंद प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३७ कोटी २५ लाख ९१ हजार ३६६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पूर्णत्वाचा कालावधी ३० महिने असून ४ ऑगस्ट २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सध्या नदीपात्रातील एका आधारस्तंभाचे काम पूर्ण झाले असून, आणखी तीन आधारस्तंभांचे काम वेगाने सुरू आहे. ठेकेदाराने नदीपात्रात राडारोडा टाकून तात्पुरता पादचारी मार्ग तयार केला आहे. मात्र दुचाकींसाठीचा मार्ग बंद असल्याने दुचाकीस्वारांची गैरसोय कायम आहे. यावर पर्याय म्हणून दुचाकीस्वारांनी सांगवडे बाजूला एक आणि मामुर्डी बाजूला एक अशा दोन दुचाकींची व्यवस्था करून नदीपात्रातील प्रवास पायी करत ये-जा सुरू ठेवली आहे.

Smt५Sf१.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com