शहर अभियंता पदाच्या 
कार्यभाराचे तात्पुरते वाटप

शहर अभियंता पदाच्या कार्यभाराचे तात्पुरते वाटप

Published on

पिंपरी, ता. ५ ः महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे एक मार्चपासून शहर अभियंतापद रिक्त आहे. मात्र, त्यांच्याकडील विविध विभागांचा कार्यभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्पुरत्या स्वरूपात मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे गुरुवारी सोपवला. त्यानुसार ओंभासे यांच्याकडे सध्याच्या पाणीपुरवठा व प्रकल्प विभागांसह स्थापत्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार; सेठिया यांच्याकडे स्थापत्य मुख्य कार्यालय विभागासह उद्यान व क्रीडा स्थापत्य, शहरी दळणवळण आणि भागवानी यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
---

Marathi News Esakal
www.esakal.com