थकीत कर, दंड त्वरित भरून 
वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

थकीत कर, दंड त्वरित भरून वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

Published on

पिंपरी, ता. ५ ः पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या १०३ वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहनांचा कर व दंड त्वरित भरून वाहने सोडवून घेऊन जाण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत वाहने जप्त केली आहेत. यातील काही वाहनांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, तर काही वाहन मालकांनी कर व दंड न भरल्यामुळे अनेक वर्षांपासून ही वाहने आरटीओ कार्यालय, राजगुरुनगर व मंचर एसटी डेपोत पडून आहेत. यातील १०३ वाहन मालकांनी आतापर्यंत वाहने सोडवून नेण्यासाठी आरटीओशी संपर्क केला नाही. गुरुवारपासून (ता. ४) पुढील ३० दिवसांत वाहनांचा कर व दंड भरून वाहने सोडवून घेऊन न गेल्यास त्या वाहनांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय आरटीओ प्रशासनाने घेतला आहे. ई-लिलावाची तारीख, वाहनांची यादी, वेळ व ठिकाण www.eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.
---

Marathi News Esakal
www.esakal.com