संवाद जोड
डीपी बॉक्सचा दरवाजा उघडा
चिंचवडगाव ते चिंचवड स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, चिंचवडगाव चापेकर चौकाजवळ हिंदुस्थान बेकरी व चितळे बंधू मिठाई दुकानाच्या बाजूला महावितरणचा डीपी बॉक्स आहे. सध्या त्या डीपी बॉक्सचा दरवाजा उघडा असल्याचे दिसत आहे. हा रस्ता रहदारीचा असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित महावितरण अधिकाऱ्यांनी तातडीने डीपी बॉक्सचा दरवाजा बंद करून आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना कराव्यात.
-इंद्रजीत चव्हाण
00976
उघड्या वायरमुळे अपघाताचा धोका
देहूगाव येथील परंडवाल चौक येथे रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. या ठिकाणी नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. तसेच काही विद्युत वायर उघड्यावर पडलेल्या दिसत आहेत. उघड्या वायरमुळे नागरिकांना अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणी दुरुस्ती करून रस्त्याची तसेच वायरची योग्य व्यवस्था करावी.
- सचिन वारखडे, देहूगाव
00975,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

