गुदमरतोय श्वास! प्रदूषणाशी संबंधित तक्रारी आणि समस्या ‘सकाळ’च्या व्यासपीठावर
पिंपरी, ता. ६ : शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाबाबत ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेद्वारे आवाज उठवला आहे. त्यावर शहरातील विविध भागांतून नागरिक प्रतिसाद देत असून, आपापल्या भागातील प्रदूषणाशी संबंधित तक्रारी आणि समस्या ‘सकाळ’च्या व्यासपीठावर मांडत आहेत.
निगडी-यमुनानगर भागातील एका खासगी कंपनीतून तीव्र दुर्गंधी येत आहे. मागील दोन वर्षांपासून स्थानिक नागरिक या समस्येने त्रस्त आहेत. हा वास पेंटसदृश असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना दमा, खोकला, घसा, डोकेदुखी, डोळे जळजळणे असे त्रास होत आहेत. या बाबत नागरिकांनी महानगरपालिका (तक्रार क्रमांक एच३०९८३४) तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (तक्रार क्रमांक ०००००१३५८०) यांच्याकडेही यापूर्वी तक्रार नोंदविलेली आहे. परंतु, दोन्ही संस्थांनी कार्यवाही केलेली दिसत नाही. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिले होते. पण, निवडणुका संपताच आमच्या समस्येचा सर्वांनाच विसर पडला आहे.
- प्रदीप पाटील, यमुनानगर, निगडी
विस्तारा हौसिंग सोसायटी, नेवाळे वस्तीसमोर सुरू असलेल्या बांधकामामुळे आम्हाला धुळीचा त्रास होत आहे. आता कुठे बांधकामाला सुरुवात झाली आहे. उद्या डंपरची ये-जा सुरू झाली, तर धुळीचे प्रमाण अजून वाढेल. त्या ठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व श्वसनाच्या आजारांनी त्रस्त आहेत. महापालिकेने बांधकामासाठी आखून दिलेल्या खालील नियमांचे पालन होताना दिसत नाही.
- चंद्रमोहन पाटील, नेवाळे वस्ती, चिखली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

