‘ई-चलन’विरोधात वाहतूकदारांचे आंदोलन
पुणे, पिंपरी, ता. ५ : राज्यातील ‘ई-चलन’ प्रणालीच्या अंमलबजावणीत त्रुटी आहेत, असा आरोप करत वाहतूकदार संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (ता. ५) ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो वाहनचालक, मालक रस्त्यावर उतरले होते.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक संघटना आणि वाहनचालकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन दिले. तसेच पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव आणि पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांना निवेदन दिले. या वेळी महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे, रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष बापू भावे, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, मंगेश देसाई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या ‘ई-चलन’ प्रणालीमध्ये त्रुटी आहेत. एका वाहनावर ४० ते ५० हजारांचा दंड लावला आहे. त्यामुळे वाहनचालक, मालक त्रस्त झाले आहेत. केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ या कायद्यात सुधारणा केली आहे. या सुधारणांमध्ये अनेक जाचक अटी घातल्याचा आरोप वाहतूक संघटनांनी केला आहे. आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर फेरविचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या सदस्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

