सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

डीपी बॉक्सजवळ वाढलेल्या झाडाचा धोका

थेरगाव येथील जय मल्हारनगर, कॉलनी क्रमांक सहा मधील ओंबळे प्लाझा या इमारती शेजारी असलेल्या विजेच्या डीपी बॉक्सजवळ उंबराचे झाड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या झाडाच्या मुळ्या डीपी बॉक्समधील विजेच्या वाहिन्यांना स्पर्श करण्याची शक्यता असून त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी.
- अरुण ओंबळे, थेरगाव
01172


नदी पात्रात टाकला जातोय कचरा

जुनी सांगवी येथे सांगवी-दापोडी पुलाच्या बाजूला प्रियदर्शनीनगरच्या सीमा भिंतीवरून काही नागरिक थेट नदीपात्रात कचरा टाकत आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचत असून परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित महापालिका विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नदीपात्रात कचरा टाकण्यास आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी.

01173

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com