गुन्हे वृत्त
हॉटेल व्यावसायिकासह दोघांना मारहाण
पिंपरी : रखवालदाराला शिवीगाळ का करता, असे विचारल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून ताथवडे परिसरातील हॉटेल व्यावसायिकासह रोखपालाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विराज दत्तात्रय खुटवड (रा. पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी उत्कर्ष शुक्ला (रा. थेरगाव) आणि राघव योगेंद्र श्रीवास्तव (रा. ताथवडे, पुणे, मूळ रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी रखवालदाराला शिवीगाळ करीत असताना फिर्यादीने जाब विचारला. यामुळे आरोपींनी फिर्यादी आणि रोखपाल आनंद बालाजी घोरबांड यांना मारहाण केली. शुक्लाने हातातील कडे फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
---------
मोटारीचा अपहार; एकावर गुन्हा
पिंपरी : भाड्याने मोटार घेऊन दरमहा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन आळंदी एका व्यक्तीने मोटारीचा अपहार केला. याप्रकरणी विठ्ठल धोंडिराम सदगे (रा. देहू फाटा, आळंदी, मूळ रा. परभणी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अंगद शिवाजी जाधव (रा. दत्त मंदिरजवळ, आळंदी देवाची) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची मोटार दरमहा १८ हजार रुपये परतावा देण्याचे आमिषाने नेली. त्यानंतर आरोपीने कोणताही परतावा दिला नाही आणि गाडीही परत केली नाही.
-----------
बनावट माल विक्रीप्रकरणी गुन्हा
पिंपरी : एका कंपनीच्या नावाने बनावट उत्पादने विक्रीसाठी ठेवणाऱ्या चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाल्हेकरवाडीतील एम. के. एन्टरप्रायजेस व चिंचवड येथील चौधरी मार्केटिंग गोडाऊन येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धरमवीर अमरनाथ धल्लोड (रा. मामुर्डी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हिराराम गिरीधारीलाल चौधरी (रा. चिंचवडेनगर) आणि विष्णुकुमार खंगाराम चौधरी (रा. चिंचवड), गजेंद्र शेरसिंग जव्हेरी (रा. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी हिराराम व विष्णुकुमार यांनी बनावट माल खरेदी करून तो विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ३४ हजार ४२० रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला. संगमनेरमधील गजेंद्र याच्याकडून त्यांनी माल घेतला होता.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

