महापालिकेत नोकरीचे लागल्याचे बनावट नियुक्तीपत्र

महापालिकेत नोकरीचे लागल्याचे बनावट नियुक्तीपत्र

Published on

पिंपरी, ता. ६ : पिंपरी चिंचवड महापालिकेत शिपाई पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून पैसे घेतले. त्यानंतर तरुणाला बनावट नियुक्तिपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक दिले. याबाबत तरुणाने महापालिकेत चौकशी केली असता ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपीला संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली आहे.
वैष्णव कालिदास शेळके (वय २७, रा. जय मल्हारनगर, रहाटणी फाटा, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सूरज सुनील नांगरे (रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना महापालिकेत शिपाई पदाची नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून आधारकार्ड व पॅनकार्ड व टप्प्याटप्याने ६ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना महापालिकेच्या नावाने सही-शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक तयार करून पाठवले. दरम्यान, फिर्यादी यांनी या नियुक्ती पत्राबाबत महापालिकेत खात्री केली असता ते बनावट असल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com