शिवजयंती निमित्त ऐतिहासिक ‘मशाल दौड’
पिंपरी, ता. ६ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री गणेश व्यायाम मंडळ तर्फे ऐतिहासिक ‘मशाल दौड’ पार पडली. शिवनेरी किल्ल्यापासून सुरू झालेली ही दौड पिंपरी चिंचवडमधील मोरेवस्ती येथे येऊन समाप्त झाली. शिवनेरी ते पिंपरी चिंचवड हे ८० किलोमीटरचे अंतर आठ तास ३० मिनिटामध्ये पार करण्यात आली. या दौडीत पाच वर्षांच्या बालकांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या ६८ शिवभक्तांनी अखंड ज्वलंत मशालीसह भाग घेतला. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला आणि वातावरण शिवमय झाले. मंडळाच्या वतीने आयोजित या दौडचे हे पाचवे वर्ष आहे. या दौडीमध्ये गुरुवर्य ॲकॅडमी स्कूल, सेंट पीटर्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

