११ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील टोळी अटकेत
पिंपरी, ता. ६ : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवून एकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थान व महाराष्ट्रातून अटक केली. या कारवाईत एक कोटी ८० लाख रुपये रक्कम गोठविण्यात आली. अभय बाबासाहेब पाटील (रा. जि. कोल्हापुर), शिवतेज राजेंद्र पोटे (रा. वाघोली), महेश करबसपा उडचणे, राहुल बहादुरप्रसाद मौर्य (दोघे रा. दहिसर पूर्व, मुंबई), युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार (रा. लोहगाव), पंकज मंगु गिरीगोस्वामी, प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (दोघे रा. राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्याचे अधिकार आरोपी अभयने शिवतेजला दिले. त्या बदल्यात त्याने रक्कम घेतल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली. पोटेकडे कसून चौकशी केली असता १५ ते २० बँक खाती सायबर गुन्ह्यासाठी वापरल्याची तसेच हा गुन्हा युवराज, प्रल्हाद व पंकज यांच्यासमवेत केल्याची कबुली दिली. त्यामुळे युवराजला पुण्यातून, तर इतर दोघांना राजस्थानातून अटक करण्यात आली. अधिक तपासात महेश व राहुलही सामील असल्याचे उघड झाल्याने त्यांना पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

