मशाल दौड, मिरवणुकांनी शिवजयंतीचा जल्लोष
पिंपरी, ता. ७ ः शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक मशाल दौड, विद्यार्थ्यांच्या वैचारिक उपक्रमांपासून ते ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीपर्यंत अनेक उपक्रमांमधून शिवप्रेमींनी शिवरायांना अभिवादन केले. शहरातील विविध संस्था, मंडळे आणि नागरिकांनी उत्साहात सहभाग घेत वातावरण शिवमय केले.
ऐतिहासिक ‘मशाल दौड’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री गणेश व्यायाम मंडळ तर्फे ऐतिहासिक ‘मशाल दौड’ पार पडली. शिवनेरी किल्ल्यापासून सुरू झालेली ही दौड पिंपरी चिंचवडमधील मोरेवस्ती येथे येऊन समाप्त झाली. शिवनेरी ते पिंपरी चिंचवड हे ८० किलोमीटरचे अंतर आठ तास ३० मिनिटामध्ये पार करण्यात आली. या दौडीत पाच वर्षांच्या बालकांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या ६८ शिवभक्तांनी अखंड ज्वलंत मशालीसह भाग घेतला. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला आणि वातावरण शिवमय झाले. मंडळाच्या वतीने आयोजित या दौडचे हे पाचवे वर्ष आहे. या दौडीमध्ये गुरुवर्य ॲकॅडमी स्कूल, सेंट पीटर्स इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी घेतली शिवरायांच्या आदर्शांची शपथ
हिंजवडी येथील आय स्क्वेअर आयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी वैचारिक शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी विचार मांडणारी भाषणे केली. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे दर्शन घडवणारा नाट्यप्रयोग सादर केला. वाईट सवयी व व्यसनांचा त्याग करण्याची आणि महाराजांच्या आदर्शांप्रमाणे स्त्रियांच्या सन्मानाचे जतन करण्याची प्रतिज्ञा या प्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली पाटील, प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचारी उपस्थित होते.
शगून चौकात शिवजयंती उत्साहात
पिंपरीतील शगून चौकात सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विधानसभा समन्वयक गणेश आहेर यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, महिला जिल्हा संघटिका अनिता तूतारे, वैशाली कुलथे, सुजाता नखाते, तस्लिम शेख, हरेश नखाते, राजाभाऊ कुदळे, संदीपान झोबडे, युवराज दाखले आदी उपस्थित होते. गोरख पाटील व मारुती म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.
ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
श्री शिव जगदंब प्रतिष्ठानच्यावतीने मासुळकर कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. प्रतिष्ठान अध्यक्ष निलिमा पुराणिक-घाडगे, कार्याध्यक्ष धनंजय पुराणिक, शहाजी मासुळकर, आश्वत हुंगुंड, प्रमोद गमे, झेवियर चुमार, रोहित मासुळकर, आचुत हुंगुंड उपस्थित होते. या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

