रंगपंचमीनिमित्त नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा
पिंपरी, ता.७ ः रंगपंचमीच्या निमित्ताने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत हळद, पालक, पुदिना, बीट, शेंदरीच्या बिया, चहापत्ती, कॉफी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करून विवध रंग कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. या प्रसंगी प्रत्यक्ष रंग तयार करून त्यांची गुणवत्ता तपासली व त्याचा सुरक्षित वापर कसा करावा हे शिकविण्यात आले.
होळी, रंगपंचमी किंवा कलाकृतींसाठी हानिकारक रसायने टाळून वनस्पती, फुले, फळे आणि खनिजांपासून नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणसंवर्धन या विषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, असे मनोगत शालाप्रमुख दर्शना कोरके यांनी केले. यावेळी उपशालाप्रमुख पी.जे. माने, पर्यवेक्षिका मनीषा कदम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यशाळेची सांगता ‘नैसर्गिक रंग, सुरक्षित रंग’ या संदेशाने करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

