निगडी-यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

निगडी-यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

Published on

पिंपरी, ता. ७ ः निगडी-यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघात अध्यक्ष गजानन ढमाले यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा संपन्न झाली. सभेत सायबर अपराध हस्तक्षेप अधिकारी मंजू मेहरा यांचे ‘सायबर फ्रॉड’ या विषयावर व्याख्यान झाले.
आकर्षक बक्षीस योजना, लॉटरी याचा मोह धरू नये ओटीपी कोणास देऊ नये बॅंक खात्यामधून पैसे गेल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर फोन करून तात्काळ तक्रार नोंदवावी. डिजिटल अरेस्ट कसे फसवे असते तुमच्या भावनांशी खेळ केला जातो आणि घाबरून आपण त्याला बळी पडतो हे उदाहरणासहित समजावून सांगितले.
पुढे त्यांनी मुलांचे गेम त्यातून येणारे अनुभव बदलणारी मानसिकता यावर भाष्य केले. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फेब्रुवारी महिन्यातील ज्येष्ठांचे वाढदिवस भेटवस्तू देऊन करण्यात आला. ‘लकी ड्रॉ’मध्ये छाया क्षीरसागर विजयी झाल्या त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. वाढदिवस असणाऱ्या ज्येष्ठानी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत सुर्वे, दत्तात्रेय गुंजाळ, गजानन ढमाले, अशोक नहार, अप्पा कुलकर्णी, प्रदीप मुजुमदार यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com