गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

Published on

दारूसाठी पैसे न दिल्याने
व्‍यावसायिकाला बेदम मारहाण
पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे घडली. गणेश भिसे, राम अशोक कांबळे, संकेत भालचंद्र वाघमारे, वेदांत मोरे (सर्व रा. सिद्धार्थनगर, दापोडी) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रांशु श्याम बारमेडा (रा. सांगवी, पुणे) यांनी दापोडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना तेथे आलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. मात्र, फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी ‘आम्ही इथले बाप आहोत’ असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीला गंभीर दुखापत झाली.

गांजा बाळगला; चऱ्होलीत एकजण ताब्यात
पिंपरी : विक्रीसाठी गांजाजवळ बाळगणाऱ्या एकाला दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई चऱ्होली येथे करण्यात आली.
महादेव जीवन शिंदे (रा. वडमुखवाडी, मूळ-लातूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे १८ हजार १०० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला.

हॉटेलमध्ये हुक्का विक्री; तिघांवर गुन्हा
पिंपरी : हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवणास व हुक्का पिण्यास एकत्र बसवून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे वर्तन केल्याने तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई भुकूम येथील डस्क अँड डाऊन हॉटेल येथे कारवाई करण्‍यात आली. आकाश सोनार, सुनील विक्रम चंद व मोहन रघुवीर सिंगनगे (रा. भुकुम, ता. मुळशी, मूळ- उत्तराखंड) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी भुकूम येथील डस्क अँड डाऊन हॉटेलमध्ये वेगळा हुक्का झोन न ठेवता ग्राहकांना एकत्र बसवून हुक्का पिण्यास दिला. येथे पोलिसांनी कारवाई करत हुक्का पॉट, फ्लेवर व अन्य साहित्य असा सहा हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदा गॅस रिफिलिंगप्रकरणी एकावर गुन्‍हा
पिंपरी : घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदा गॅस भरणाऱ्या एकावर चिखली पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई चिखलीतील नेवाळेवस्ती परिसरात करण्यात आली. सत्यम शंकर भोसले (रा. नेवाळेवस्ती, चिखली, मूळ-सातारा) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. आरोपी बेकायदा व धोकादायकरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. येथे पोलिसांनी छापा टाकून एक मोठा सिलेंडर, आठ छोटे सिलेंडर, रिफिलिंग साहित्य व वजनकाटा असा १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com