गाथा पारायण सोहळ्याची सांगता

गाथा पारायण सोहळ्याची सांगता

Published on

पिंपरी, ता. ८ : श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त श्री संत गाडगे महाराज मराठा धर्म शाळेच्या वतीने गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. या सोहळ्याची शनिवारी (ता. ७) सांगता झाली. यामध्ये सुखदेव महाराज तांबे, मारुती महाराज सुतार, प्रसाद महाराज राऊत, रामनाथ महाराज घोडके यांची कीर्तन झाली. शनिवारी काल्याच्या प्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. हा कार्यक्रम बापू महाराज लोहार व ज्ञानेश्वर महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. देहूतील श्री संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळेचे व्यवस्थापक संजय जाधव व तानाजी पाटील यांनी नियोजन केले होते. यावेळी पंढरपूरच्या धर्मशाळेचे विश्वस्त अशोक माने, दादर धर्मशाळेचे विश्वस्त प्रशांत देशमुख, शिवाजी काळे, दत्तात्रेय शिंदे आदी उपस्थित होते.
---

Marathi News Esakal
www.esakal.com