कल्पनेपासून स्टार्टअपपर्यंत
- प्रा. राहुल बराटे (एमआयटी आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालय, आळंदी)
एमआयटी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय आळंदी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त फ्युजन आर्क क्लब आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल यांच्यातर्फे नवोन्मेष पोस्टर सादरीकरण स्पर्धा झाली. ‘नवोन्मेष ते उद्योग ः कल्पनेपासून स्टार्टअपपर्यंत’ अशी स्पर्धेची संकल्पना होती. वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या ४९ संघांतील ९० विद्यार्थ्यांनी पोस्टर्स सादरीकरण केले. विविध सामाजिक व तांत्रिक समस्यांवर आधारित अभिनव कल्पना मांडल्या. संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. अक्षदा कुलकर्णी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन, इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल संयोजक डॉ. संदीप ढवळे उपस्थित होते. समन्वयक प्रा. निकिता देवरे होत्या. विद्यार्थ्यांनी समस्या, उपाययोजना, तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नाची संधी आणि भविष्यातील विस्तार यांचे सादरीकरण केले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी पारितोषिके दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी विचारसरणी, संशोधन वृत्ती आणि उद्योजकतेची जाणीव विकसित होण्यास मदत झाली.
(01942)
वीज वाचवा; प्लॅस्टिक टाळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आळंदी यांच्यातर्फे क्लायमेट ॲक्शन युनिट अंतर्गत पोस्टर सादरीकरण स्पर्धा झाली. ‘वीज वाचवा’, ‘प्लॅस्टिकला नकार द्या’, ‘खरेदी पूर्वी थोडा विचार करा’ या कार्यक्रमांसाठी संकेत फलक प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक घोषवाक्ये, प्रभावी चित्रे आणि माहितीपूर्ण मांडणीद्वारे ऊर्जा बचत, जलसंवर्धन, प्लॅस्टिकमुक्त जीवनशैली आणि जबाबदार ग्राहक वृत्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. प्रवीण कार्ले व प्रा. जयवंत भूमकर यांनी परीक्षण केले. प्रा. राजश्री सातपुते व प्रा. सोनाली आभंग यांनी समन्वय साधला. क्लायमेट ॲक्शन युनिट समन्वयक प्रा. शुभांगी गायकर आणि आयआयसी संयोजक डॉ. संदीप ढवळे यांनी संयोजन केले. डॉ. अक्षदा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले.
स्पोर्ट्स सेलिब्रेशन उत्साहात
- साक्षी मोगल (मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज येथे स्पोर्ट्स सेलिब्रेशन सप्ताह’ झाला. क्रिकेट, रनिंग, चेस, कॅरम इत्यादी खेळांचा समावेश होता. क्रीडा प्रमुख शुभम शिंदे यांची समन्वय साधला. विद्यार्थ्यांनी खेळांच्या माध्यमातून एकता, सामर्थ्य, सहकार्याची भावना दाखवली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. प्रकाश दीक्षित, प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, प्राचार्य डॉ. मनोज साठे, समन्वयक प्रा. डॉ. प्रसन्न चव्हाण, आयक्युएसी समन्वयक प्रा. धन्वंतरी नरवडे यांनी मार्गदर्शन केले.
(01944)
माजी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
- प्रा. विद्याश्री कोकणे (राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे)
जेएसपीएम राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे येथील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाने माजी विद्यार्थ्यांची भेट आणि अभिवादन कार्यक्रम घेतला. यशस्वी पदवीधरांचे मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि सामायिक शिक्षण अनुभवांना प्रोत्साहन देणे हा उद्देश होता. पॅनेल चर्चा झाली. राजेश सबने (एमडी ऑटोवन ग्रुप ऑफ कंपनी), अमित अस्ती (एचआर ऑफ एम्क्युअर फार्माक्युटिकल लिमिटेड), अमोल जैन (डायरेक्टर ऑफ एचसीएल), कृष्णा चव्हाण (व्हाइस प्रेसिडेंट, ॲप डेव्हलपमेंट सिटी बँक), हर्षद कुलकर्णी (स्टँटेक इंडिया प्रोजेक्ट कंट्रोलर), अश्विनी माने (सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर), सागर पाटील (असोसिएट डायरेक्टर युबीएस), सूरज डाकले (व्हाइस प्रेसिडेंट क्लाऊड इंजिनिअरिंग) यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यापासून ते व्यावसायिक टप्पे गाठण्यापर्यंत चिकाटी, अनुकूलता आणि आयुष्यभर शिकण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. व्यावसायिक कार्यक्षेत्रासाठी मार्गदर्शन झाले. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. सौरभ तायडे यांनी संयोजन केले. प्राचार्य डॉ. अविनाश बडधे, संकुल संचालक डॉ. सुधीर भिलारे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक डॉ. रवी जोशी, अनिल भोसले यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे संस्थापक डॉ. टी. जे. सावंत यांनी प्रोत्साहन दिले.
(01941)
यशस्वी पूल कॅम्पस ड्राइव्ह
(अलार्ड स्कूल ऑफ फार्मसी)
अलार्ड स्कूल ऑफ फार्मसी, अलार्ड युनिव्हर्सिटीमध्ये पूल कॅम्पस ड्राइव्ह यशस्वी झाला. वीसपेक्षा अधिक महाविद्यालयांमधील १५० पेक्षा अधिक फार्मसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समन्वयन प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी सपना नागरे यांनी केले. प्लेसमेंट टीम सदस्य अपेक्षा आणि शीतल चौधरी यांनी सहकार्य केले. डॉ. गणेश आंधळे (अधिष्ठाता) यांचे मार्गदर्शन लाभले.
(01940)
वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
- वैष्णवी मुंजाळ, श्रेया लोहार (अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग चऱ्होली येथे ‘संग्राम २०२’ वार्षिक क्रीडा स्पर्धा जल्लोषात झाली. कुलगुरू डॉ. आर. के. जैन, प्राचार्य डॉ. एफ. बी. सय्यद, विभागप्रमुख डॉ. एस. एम. खैरनार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांचे महत्त्व अधोरेखित झाले. शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्यासाठी क्रीडा अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, दोरीखेच, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, ई-स्पोर्टस् अशा स्पर्धा झाल्या. ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट क्रीडाभावना, समन्वय आणि स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते.
(01939)
रोजगारक्षमता, नोकरी प्रशिक्षण
- प्रा. सलोनी शिंदे (एम. एम. पॉलिटेक्निक)
विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता कौशल्ये, संवाद क्षमता, व्यावसायिक नीतिमत्ता आणि मुलाखतीची तयारी वाढवणे या उद्देशाने मराठवाडा मित्र मंडळाच्या पॉलिटेक्निकमध्ये ऑटोमोबाईल, संगणक, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय रोजगारक्षमता आणि नोकरी तयारी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाला. आत्मजागरूकता, देहबोली, व्यावसायिक सौंदर्य, प्रभावी संवाद, गट चर्चा, मुलाखतीची तयारी, नोकरीच्या संधी आणि नीतिमत्ता अशा पैलूंचा समावेश होता. सर्व सत्रे विनय भोसले यांच्याद्वारे झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव व प्राचार्या गीता जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. प्लेसमेंट अधिकारी गणेश म्हाळणकर यांनी संयोजन केले. प्रा. प्रतिभा सावळजकर, प्रा. गीतांजली शेळके, प्रा. निखिल साळुंखे, प्रा. प्रज्ञा पाटील, प्रा. शीतल खेसे यांचे सहकार्य लाभले.
(01943)
‘इग्नायटिंग इंटेंट’ उत्साहात
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळविण्यासोबतच ठोस वैयक्तिक दृष्टिकोन, नेतृत्वगुण व भविष्यातील औद्योगिक गरजांसाठी सज्ज व्हावे या उद्देशाने मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकने ‘इग्नायटिंग इंटेंट : फ्रॉम टेक्निकल स्किल टू पर्सनल लेगसी’ हा कार्यक्रम घेतला. व्याख्याते चैत्राम पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव व तेज निवळीकर यांनी तांत्रिक शिक्षणातील शिस्त, नावीन्य व समर्पण यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याच्या उद्देशाने ‘सिमॅट्रॉन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर मोल्ड अँड डाय - डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग’ व ‘राधेटेक इंजिनिअरिंग’ सोबत सामंजस्य करार झाला. सिमॅट्रॉनचे सचिन बोधक, राधेटेक इंजिनिअरिंगचे सचिन किल्लारीकर, फोर्ब्स मार्शलचे जॉर्ज कार्डोज उपस्थित होती. प्राचार्या गीता जोशी, दाना इंडियाचे शफीक शेख व ‘टाटा इंटरनॅशनल’चे योगेश तपकिरे यांनी मार्गदर्शन केले. मोहिनी पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

