आयसीएआय शाखेला ‘वेस्टर्न रिजन’चा पुरस्कार

आयसीएआय शाखेला ‘वेस्टर्न रिजन’चा पुरस्कार

Published on

पिंपरी, ता. ८ : निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) या सीए शाखेला ‘वेस्टर्न रिजन’कडून दिला जाणारा उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सीए शाखेला ‘द्वितीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार’, तर पिंपरी -चिंचवड सीए विद्यार्थी संघटनेला ‘सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन २०२५’ हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पश्चिम विभागीय अध्यक्ष सीए केतन सैया, विभागीय उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, सीए जीनल सावला, सीए फेनिल शाह यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड शाखेचे मावळते अध्यक्ष सीए वैभव मोदी, सीए सारिका चोरडिया, सीए मनोज मालपाणी, महावीर कोठारी, विद्यार्थी संघटनेचे सीए धीरज बलदोटा यांनी हा पुरस्कार स्वी
कारला. यावेळी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष ओंकार टेंगले, उपाध्यक्ष रिंकू अग्रवाल, खजिनदार-सिद्धांत चोरडिया, सदस्य अनुवा बाबेल, इशिका मंडल, वर्षम बागली, सदस्य- प्राजक्ता जोशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com