सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

मिलिंदनगर परिसरात कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष

पिंपरी येथील मिलिंदनगर स्मशानभूमी लगतच्या रस्त्याच्या परिसरात ओला व सुका कचरा एकत्रितपणे जमा करून टाकला जात आहे. हा कचरा दीर्घकाळ उचलला जात नसल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे तसेच परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. यामुळे परिसरातील भटक्या गायी व इतर जनावरे प्लॅस्टिकसह हा कचरा खात असल्याचेही दिसून येते, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
-महेश भोरे, पिंपरीगाव
02119

एल्प्रो स्कूलसमोरील खड्ड्याचा धोका
चिंचवड येथील श्रीधरनगर मुख्य रस्त्यावर एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या गेटसमोर रस्त्याच्या मधोमध यापूर्वी बसवलेले ब्लॉक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी खड्डा पडला असून वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे. हा रस्ता मुख्य वाहतुकीचा मार्ग असून येथून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. तसेच माटे शाळेत जाणारे विद्यार्थीही या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी पुन्हा ब्लॉक बसविण्याची व्यवस्था करावी.
- मधुकर कांबळे, चिंचवड
02120

गदिमा नाट्य संकुल शेजारील जागेचा विकास करावा
निगडी प्राधिकरण येथील गदिमा नाट्य संकुल शेजारील मोकळ्या जागेत महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा राडारोडा टाकलेला आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता बिघडली असून त्या जागेचा योग्य उपयोग होत नाही. या ठिकाणी आधीपासून असलेल्या झाडांचा विचार करून नागरिकांसाठी वॉकिंग पाथ तसेच लहान उद्यान विकसित करता येऊ शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल. महापालिकेने या जागेकडे लक्ष देऊन राडारोडा हटवून उद्यान विकसित करण्याची योजना राबवावी.
- संजय शाह, निगडी
02118

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com