सायन्स पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय महिलादिन जल्लोषात
पिंपरी, ता. ९ ः विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करून पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सायन्स पार्कच्या वतीने नीता भावसार, प्रा. डॉ. अनुराधा ठाकरे, संगीता घोडके, सुरेखा कुलकर्णी यांना स्मृती भेट व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपारिया यांनाही स्मृतिभेट व प्रशस्तीपत्र देऊन सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रशांत पाटील, सारंग ओक, सिकंदर घोडके उपस्थित होते. तुपे यांनी विज्ञान, कौशल्य विकास आणि नवोन्मेय क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण सर्वसमावेशक व ज्ञानाधिष्ठित समाज घडविण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमिताने प्लॅस्टिक मुक्त कॅम्पस अभियानाची सुरुवात देखील करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

