गहुंजेतील छत्रपती मंदिरात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम
सोमाटणे, ता. १० ः गहुंजे येथील छत्रपतींच्या मंदिरात शिवजयंतीनिमित्त सोमवारी सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
राज्यातील गावांमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरे आहेत. गहुंजेमध्ये ग्रामदैवताशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असून हे या गावाचे वेगळेपण आहे. त्यामुळे हे मंदिर राज्यात दुर्मिळ मानले जाते. शिवभक्तांनी पहाटे दुग्ध स्नान, महापूजा, अभिषेक, आरती आदी धार्मिक कार्यक्रम श्रद्धेने केले. यानंतर महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री शिवव्याख्यान, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.
ध्वनी, हवा, पाणी यांचे प्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुक न काढता विविध धार्मिक कार्यक्रमावर भर देण्यात आला. शिवजयंती उत्सवात गावातील सर्व नागरिक, महिला, तरुण, शालेय विद्यार्थी, मुले सहभागी झाली. या आगळ्यावेगळ्या शिवजयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी अनेकांनी शेतीची कामे बंद ठेवली होती. रात्री उशिरा शिवभक्तांनी शिवज्योत आणली. धार्मिक विधीने उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवज्योतीचे स्वागत केले.
---------------------------------------------------------------------------------
गहुंजे ः छत्रपतींच्या मंदिरात शिवव्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

