नगरसेवकांची पदे लिलावातच काढा : अंधारे
पिंपरी, ता. ८ : ‘‘भाजपकडून उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आमच्या उमेदवारांना धमकी देत पैशांच्या जोरावर राजकारण केले जाते. त्यामुळे भाजपने निवडणुकीचा फार्स करण्याऐवजी नगरसेवकांची पदे थेट लिलावातच काढा,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर गुरुवारी (ता.८) ताथवडे येथी केली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल चिन्हाबाबत अंधारे म्हणाल्या, ‘‘निवडणूक आयोग आमच्याबाबत भेदभाव करत आहे. आमच्या पक्षाचे मशाल चिन्ह छपाईमध्ये व्यवस्थित दिसत नाही. मतदारांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम निर्माण करणे हा खोडसाळपणा आहे. याबाबत तक्रार नोंदवली आहे. ताथवडे महापालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्षे झाली. तरीही जिल्हा परिषद शाळा महापालिकेकडे वर्ग केली नाही.’’
‘‘शहरात वाहतूक, पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट, अनधिकृत बांधकाम, जमीन अधिग्रहण, नव्याने समाविष्ट गावांचा प्रश्न आ वासून उभा आहे. तरीही राष्ट्रवादी व भाजप भ्रष्टाचारात गुंग आहेत. आमदार महेश लांडगे बोलले की, अजित पवार हे स्वतःचे घोटाळे लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही याबाबत भाष्य केले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात. मग अशा माणसाला भाजपने सोबत घेण्याची अपरिहार्यता का आहे? भाजप भ्रष्टाचारांवर पांघरून घालते,’’ असा आरोपही अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या.....
- भाजप दुसऱ्यांची मुले सांभाळणारा पक्ष
- भाजपमध्ये सुखावलेले आणि दुखावलेले असे दोन गट
- सामान्य कार्यकर्ते व निष्ठावान सभासदांना भाजपमध्ये स्थान नाही
- इतर पक्षांचे उमेदवार पळवणे ही भाजपची राजकीय सूज
- मूल्यहीन राजकारणाचे नवे मॉडेल भाजपनेच रुजवले
- महापालिकेची लूट कोणी केली, ते भाजप आणि राष्ट्रवादीने सांगावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

