साडेसहाशे गावांसाठी तीनच अग्निशमन केंद्र

साडेसहाशे गावांसाठी तीनच अग्निशमन केंद्र
Published on

पिंपरी, ता. ११ : वाढते नागरीकरण, औद्योगिक विस्तार आणि महामार्गांवरील वाढती वर्दळ लक्षात घेता ही संख्या अत्यंत अपुरी असल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील तब्बल साडेसहाशे गावांच्या सुरक्षेची जबाबदारी तीन अग्निशमन केंद्रांवर आहे. नवीन अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असला, तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसून, अद्याप जागाच निश्चित होत नसल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे.
सध्या ‘पीएमआरडीए’च्या अखत्यारित वाघोली, मारुंजी आणि नांदेड सिटी येथेच अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, प्राधिकरणाच्या विस्तीर्ण क्षेत्रात नऊ तालुक्यांचा समावेश असून, अनेक भाग पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांशी जोडलेले जात आहेत. अशा परिस्थितीत आग, अपघात किंवा इतर आपत्तीच्या घटनांमध्ये तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी अधिक केंद्रांची गरज सातत्याने व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने दहा नवीन अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन केंद्रांच्या उभारणीचा निर्णय घेतला होता. यामुळे आग नियंत्रण किंवा मानवनिर्मित संकटांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

हद्द वाढते, नियोजन नाहीच
‘पीएमआरडीए’ची हद्द सुमारे सात हजार चौरस किलोमीटर आहे. यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, औद्योगिक वसाहती, वेगाने विकसित होणारी उपनगरे आणि मोठी गावे समाविष्ट आहेत. नियोजित केंद्रांची उभारणी झाल्यास प्रतिसादाचा वेळ कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे.

नियोजित दहा अग्निशमन केंद्रे
पुरंदर, मावळ, शिरूर, दौंड, खेड, हवेली या अंतर्गत जवळपास दहा अग्‍निशमन केंद्र प्रस्‍तावित आहेत. मात्र, जागा निश्‍चित व भूसंपादन प्रक्रियामुळे ती प्रक्रिया अनेक वर्षे अडकून पडली आहे.

अधिकारीच नाही
या विभागात पदांची कमरतात असल्‍याने गेल्‍या वर्षीच महाराष्‍ट्र अग्निशमन सेवा संचनालयास नव्‍याने भरतीबाबत कळवले होते. त्‍यानुसार अग्निशमन, सहायक अग्निशमन अधिकारी या गटातील सात पदे रिक्‍त आहेत. त्‍यातच आता नुकतेच मुख्‍य अग्निशमन अधिकारी सेवानिवृत्त झाले असून, अन्‍य उप अधिकारीदेखील अन्‍य ठिकाणी गेले. सद्य:स्थितीत केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे.

कोट
कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे बांधकाम सुरू आहे. तर, उरळी कांचन येथेदेखील केंद्राला जागा मिळाली आहे. इतर केंद्राबाबत लवकरच आढावा घेतला जाईल.
- डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्‍त, ‘पीएमआरडीए’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com