

पिंपरी, ता. २७ ः पुर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रीकृष्ण एम्पायर, पूर्णानगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात हे कार्ड काढता येणार आहे.
पारदर्शक आणि सोईस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने एनसीएमसी प्रणाली लागू केली आहे. सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली आहे. हे कार्ड काढण्यासाठी दिव्यांगासह ज्येष्ठ नागरिक आणि महिला एसटी आगारात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मात्र, आगारात दररोज होणारी गर्दी आणि वेळ लक्षात एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा पूर्णानगर येथे उपलब्ध करून देण्याची मागणी पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने एसटी महामंडळ प्रशासनाला केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आठ दिवस पूर्णानगर येथे कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.
‘‘ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी आगारात जाणे शक्य नाही. त्यामुळे पूर्णानगर येथेच कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती एसटी प्रशासनाकडे केली होती. त्यांनी आमची मागणी मान्य केली.
- सुनील कदम, कार्याध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्णानगर
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.