मारहाणप्रकरणी दोघांना अटक

मारहाणप्रकरणी दोघांना अटक
Published on

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करीत कोयत्याने वार केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरीगाव येथे घडली. याप्रकरणी धीरज विशाल उल्लारे (रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओम विलास गोटे (रा. भाटनगर, पिंपरी) व सूरज सोनू वाल्मीकी (रा. बौद्धनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या आणखी एका साथीदारावर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र वैभव भाईकट्टी व इतर पिंपरीगाव येथील ग्रीन पार्क येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी ओम व त्याचे साथीदार तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. ओमने त्याच्याजवळील कोयता फिर्यादीला मारण्यासाठी उगारला. तेव्हा फिर्यादीचा मित्र वैभव याने त्याला वाचविण्यासाठी हात मध्ये घातला असता त्याच्या हातावर कोयता मारून जखमी केले.

कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी : एका बँकेतून कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची दोन लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्‍यात आली. ही घटना पिंपरी येथील कमला क्रॉस बिल्डिंग येथे घडली. याप्रकरणी किरण भालचंद्र सूर्यवंशी (रा. निगडी) यांनी पिंपरी पोलिस फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश एकनाथ सूर्यवंशी (रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीला जन विकास कम्युनिटी प्रा. लि. या बँकेकडून ५० लाख रुपयांचे मालमत्ता तारण कर्ज आठ दिवसांत काढून देतो, असे आश्वासन दिले होते. कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली वेगवेगळी करणे सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी तीन लाख ५५ हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही कर्ज मंजूर न करता त्याने त्यातील केवळ ७० हजार रुपये परत केले. उर्वरित दोन लाख ८५ हजार रुपये मागितले असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून धमकी दिली.

जुगारप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या जुगार खेळणाऱ्या चौघांवर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्‍या पथकाने कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई चऱ्होली बुद्रूक येथील आझाद चौक परिसरात करण्‍यात आली. आकाश शंकर तापकीर, सुमीत उर्फ बाळू येवले, अनिल तापकीर (सर्व रा. चऱ्होली) आणि प्रतीक कदम (रा. निरगुडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आझाद चौकातील एका वॉशिंग सेंटरच्या शेजारी आरोपी मोबाइलवर जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी आकाश तापकीर हा इतरांच्या सांगण्यावरून मटका घेत असताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल, रोख रक्कम आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com