वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका

वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका
Published on

पिंपरी, ता. ३१ ः शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस शहराचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आले आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. तीव्र उन्हात गेल्यामुळे चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी व अशक्तपणा जाणवणे या आरोग्याच्या समस्या उद्‍भवत आहेत. दवाखान्यातही या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

उष्माघाताची कारणे
प्रदीर्घ काळ कडक उन्हात किंवा उष्ण वातावरणात काम केल्यास शरीराची तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे निर्जलीकरण होते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे या समस्या होऊ शकतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघातामुळे मेंदू, मूत्रपिंड, हृदय यांना अपाय होऊ शकतो.

काय आहेत लक्षणे
- अंगात प्रचंड ताप भरणे
- त्वचा कोरडी पडणे किंवा घाम न येणे
- तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळणे
- हृदयाचे ठोके वेगवान होणे आणि धाप लागणे
- स्नायूंमध्ये तीव्र कळा येणे किंवा पेटके येणे

ही घ्या काळजी
- पाण्याचे सेवन वाढवा, तहान नसली तरी भरपूर पाणी प्या
- लिंबू सरबत, ताक, शहाळे आणि ओआरएस यांचे सेवन करा
- दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा
- बाहेर जाताना सुती, सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरा. टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करा
- घराबाहेर पडताना पुरेसे जेवण किंवा नाश्ता करूनच बाहेर पडा. रिकाम्या पोटी बाहेर पडू नका
- चहा, कॉफी आणि मद्यपान टाळा
- उन्हात काम करणे टाळा

‘‘वाढत्या उन्हामुळे तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा या समस्या वाढल्या आहेत. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्‍यक आहे. एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास होत असेल, तर त्याला तातडीने सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. थंड पाण्याने शरीर पुसून घ्यावे आणि शुद्धीवर असल्यास पाणी द्यावे. प्रकृती खालावल्यास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.’’
- डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय तज्ज्ञ
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com