महाराष्ट्राचा हरमीत सिंग ‘भारत श्री’चा मानकरी

महाराष्ट्राचा हरमीत सिंग ‘भारत श्री’चा मानकरी
Published on

पिंपरी, ता.३१ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथे आयोजित महापौर चषक ६६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद, ६३ व्या कनिष्ठ शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा हरमीत सिंग ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ ठरला. त्यानेच ‘भारत श्री’चा किताब पटकाविला. महाराष्ट्राचाच उमेश गुप्ता उपविजेता ठरला.
इंडियन बॉडी बिल्डिंग ॲण्ड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पिंपरी चिंचवड ॲमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही स्पर्धा झाली. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते बक्षीस झाले. क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम उर्फ बापू जाधव, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्या सुषमा तनपुरे, क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, फेडरेशनचे सचिव डॉ. संजय मोरे, खजिनदार राजेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेचे पहिल्या तीन क्रमांकाचे निकाल
पुरुष कनिष्ठ गट ः ५५ किलो ः मनीष म्हात्रे (महाराष्ट्र), अक्षय (दिल्ली), संतानु मल्लिक (ओडिशा). ६० किलो ः अनिल सामंतराय, चंदन दास (ओडिशा); राहुल (दिल्ली). ६५ किलो ः नवीन विश्वकर्मा (उत्तरप्रदेश); मंथन पाटील (महाराष्ट्र); सायला तलवार (गोवा). ७० किलो ः अर्पण सपकाळ, शुभम वीर (महाराष्ट्र), मयूर कोनवार (आसाम). ७५ किलो ः साहिल सावंत (महाराष्ट्र); फेबिन बैजू, हरिंद्रनाथ आर. (केरळ). ८० किलो ः विशाल वसावा (गुजरात); शाहनवाज कादरी (ओडिशा); हृषिकेश मेहर (महाराष्ट्र). ८० किलोपेक्षा जास्त ः कांतम कुमार (आंध्रप्रदेश); आयुष तांडेल (महाराष्ट्र); मिधुन सायमन (केरळ). क्लासिक ः १७१ सेमीपर्यंत ः शुभम वीर (महाराष्ट्र); चंदन दास (ओडिशा); अर्पण सपकाळ (महाराष्ट्र). १७५ सेमीपर्यंत ः दारिस डाबरे, आकाश तिवारी (महाराष्ट्र). १८० सेमीपर्यंत ः प्रणव पवार, हृषिकेश मेहर (महाराष्ट्र).
फिजीक ः १७१ सेमीपर्यंत ः आकाश दडमल, जय नवगिरे (महाराष्ट्र); अभिषेक सिंग (मणिपूर). १७५ सेमीपर्यंत ः जिंटू कर (आसाम); समाधान निसाळ, सुशांत जाधव. १८० सेमीपेक्षा कमी ः नीलेश गुरव, मयूर शिंदे, गौरव ठाकरे (महाराष्ट्र). १८० सेमीपेक्षा जास्त ः स्वागतम पाटील, जयीश परदेशी (महाराष्ट्र); दीपक साहू (ओडिशा).

दिव्यांग ः खुला गट ः नीतेश भंडारी, सुधीर मंकार, कृष्णा बागूल (महाराष्ट्र). कनिष्ठ महिला फिजीक ः खुला गट ः खुशी नांबियार (गोवा); रिद्धी पारकर (महाराष्ट्र). बॉडी फिटनेस ः खुशी नांबियार (गोवा); आराध्या नायर, लक्ष्मी हंसदाह (ओडिशा). पुरुष प्रौढ (मास्टर्स) ४० वर्षांवरील ः कमलेश आचरा, मनोहर बोचरे, दत्ताराज नाईक (महाराष्ट्र). ५० वर्षांवरील ः रवींद्र माने (नौदल), सुरेश ए. (केरळ); मोमोटोम्बा सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com