महापालिकेच्या तिजोरीत ५,२६२ कोटींचे उत्पन्न

महापालिकेच्या तिजोरीत
५,२६२ कोटींचे उत्पन्न
Published on

पिंपरी, ता. १ ः आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अखेरीस विविध विभागांमार्फत महापालिकेला पाच हजार २६२ कोटी रुपयांचे उत्‍पन्न मिळाले. यात सर्वाधिक ९४७ कोटी रुपये उत्पन्न मिळकत कर विभागाला मिळाले आहे. उद्दिष्टापेक्षा ४७ कोटी रुपयांनी अधिक उद्दिष्ट गाठले आहे.
मिळकतकर, पाणीपट्टी थकबाकी वसुलीवर महापालिकेने अधिक भर दिला होता. त्यासाठी जप्ती, लिलाव, जाहीर प्रसिद्धी केली. शिवाय, मार्च महिन्यात थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवली. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी थकबाकीसह कराचा भरणा केला. पाणीपट्टीची ८० कोटी ७४ लाख नऊ हजार ८१० इतकी रक्कम वसूल झाली आहे.

असे मिळाले उत्पन्न (कोटी रुपये)
विभाग / उत्पन्न
जीएसटी / २३६७
करसंकलन / ९४७
बांधकाम परवाना / ७९४
मुद्रांक शुल्क / ४४३
ठेवींचे व्याज / १३६
आकाशचिन्ह परवाना / २१
भांडवली जमा / १२५
पाणीपुरवठा / ८०
झोपडपट्टी सेवाकर / १
अग्निशमन / १७८
इतर विभाग / १७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com