

पिंपरी, ता. २ : भूमिगत पाण्याच्या टाकीत पडल्याने प्रियांका मनोज विश्वकर्मा (रा. पवनानगर, जुनी सांगवी) या तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना जुनी सांगवीतील पवनानगर येथे घडली. याप्रकरणी मनोज उजैन विश्वकर्मा यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जागामालक मनीष पवार, कंत्राटदार जयराम कांबळे, वसंत बनसोडे यांना अटक केली आहे. पवनानगर येथील लेन क्रमांक एक येथे मनीष पवार यांचे बांधकाम सुरू असून, कांबळे व बनसोडे हे कंत्राटदार आहेत. आरोपींनी येथील भूमिगत पाण्याच्या टाकीला सुरक्षिततेच्या दृष्टीने झाकण न लावता टाकी उघडी ठेवली. प्रियांका हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
---