पावसाळी पाणी निचऱ्यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना करा

पावसाळी पाणी निचऱ्यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना करा
Published on

पिंपरी, ता. २ ः रस्त्यांवरील खोदकामे, अपूर्ण कामे, खड्डे, अपुऱ्या निचऱ्यामुळे पावसाचे पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. नागरिक, वाहनचालक व पादचाऱ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला तत्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचा आदेश दिला.
महापौर रवी लांडगे म्हणाले, ‘‘सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्ती केली जाईल. सर्व खोदकामे बंदिस्त करून रस्ते पूर्वस्थितीत आणले जातील. साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. प्रमुख चौक, पूल, भुयारी मार्ग व सखल भागांत विशेष पथके नियुक्त करून सतत देखरेख राहील. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी २४ बाय सात नियंत्रण कक्ष सक्षम केला जाईल. हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.’’

मध्यमकालीन उपाययोजना
- पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटार स्वच्छतेची कामे
- वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी स्वतंत्र निचरा आराखडा
- विविध विभागांत समन्वयासाठी विशेष समन्वय समिती
- रोड कटिंग परवानग्यांवर कडक अंमलबजावणी
- रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी तृतीय पक्ष तपासणी यंत्रणा

दीर्घकालीन उपाययोजना
- एकात्मिक पर्जन्यजल व्यवस्थापन आराखडा करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी
- स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूरस्थितीचे रिअल-टाइम मॉनिटरिंग
- अंडरग्राउंड युटिलिटी डक्ट प्रणाली विकसित करून खोदकामे टाळले जातील
- सखल भागांमध्ये कायमस्वरुपी पंपिंग स्टेशन उभारणार
- जनजागृतीद्वारे नाल्यांत कचरा टाकण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com