

गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची १५ लाख, ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना चिंचवड स्टेशन येथे घडली.
या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला. आरोपींनी फिर्यादीला ऑनलाइन शेअर खरेदी-विक्री करण्यास सांगून नफ्याचे आमिष दाखवले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा न देता त्याची फसवणूक केली.
सिगारेट न दिल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : दुकानाची चावी नसल्याने सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून तिघांनी मिळून चिंचवड येथे एका दुकानदाराला मारहाण तसेच कोयत्याने हल्ला केला.
या प्रकरणी विकास झिंजाडे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य उर्फ लाल्या जाधव, अजित उर्फ मद्री पवार यांना अटक केली असून उदल उर्फ चिकन्या वाल्मीकी (सर्व रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उदल याने विकास यांच्यावर कोयत्याने वार केले.
नफ्याच्या आमिषाने २० लाखांना गंडा
पिंपरी : गुंतवणुकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला २० लाख, ५८ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना रावेत येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. आरोपीने फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये फायदा करून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी महिलेला डिमॅट खात्यामध्ये फायदा होत नसल्याने आरोपीने ‘तुम्ही मला पैसे ट्रान्स्फर करा, मी माझ्या खात्यावरून गुंतवणूक करून तुम्हाला फायदा करून देतो’ असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र कोणताही परतावा न देता फसवणूक केली.
टेम्पो चालकाला मारहाण
पिंपरी : ‘गाडी सावकाश चालव’ असे म्हटल्याच्या कारणावरून भोसरीतील इंद्रायणी नगर येथे एका दुचाकीस्वाराने बबलू शेख (वय ४१, रा. बालाजीनगर, भोसरी) या टेम्पो चालकाला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी रितेशकुमार राम (वय २२, रा. बौद्धनगर, पिंपरी) या दुचाकीस्वाराला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.