

पिंपरी, ता. ४ ः पिंपरी चिंचवड शहरात अजूनही नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी वणवण फिरावे लागत आहे. गॅस वितरक कार्यालयात फोन केला तर प्रतिसाद देत नाहीत. वितरण कार्यालयात गेले तर ते बंद, अशा गॅस वितरकांची अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार करुनही संबधितांवर कारवाई होत नसल्याने अहवालाचा केवळ दिखावा कशाला ? अन् तक्रार करायची तरी कुठे ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात तीन गॅस विक्रेत्या कंपन्या असून सुमारे ४१ गॅस वितरक आहेत. सुमारे साडेसहा लाख ग्राहकांनी गॅसची नोंदणी केली आहे. यातील बहुतांश नागरिकांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एसपीसीएल) कंपनीच्या गॅस वितरकांकडे नोंदणी केली आहे.
आतापर्यंत शहरातील विविध पाच गॅस वितरकांच्या कार्यालयांची तपासणी करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील.
- डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.