

पिंपरी, ता.६ ः नसरापूर व चाकण येथील बालकांवर लैंगिक अत्याचार करून झालेले खून याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, प्रवीण कदम, आबासाहेब ढवळे, वसंत पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव, मोनिका भोसले, शीतल मोरे, सोनिया दिलपाक आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिड्डे, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले.
दर महिन्याला राज्यात महिला व लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची शेकडो प्रकरणे घडत असून यावर सरकारकडून कोणतेही ठोस उपाय होत नाहीत. मुख्यमंत्र्यांसह सरकारचा निषेध करण्यात आला. नसरापूर, चाकण येथे बालकांवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी देण्याची मागणी करण्यात आली तसेच गुन्हेगारांचा निषेध करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.