गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक
Published on

गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक;
हिरा ग्रुपच्या मालकिणीवर गुन्हा

पिंपरी, ता. ७ : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपये गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी हिरा ग्रुपच्या मालकिणीवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी सलीम लालमोहंमद हन्नूरे (रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिरा ग्रुपची मालकीण डॉ. नोहेरा शेख (रा. हैद्राबाद, तेलंगणा) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी २०१७ मध्ये हिरा ग्रुपमध्ये वार्षिक ३६ टक्के परतावा मिळेल, या उद्देशाने अनुक्रमे २१ व ४ लाख २५ लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीला त्यांना आरोपीने अनुक्रमे ७० व ९ असा ७९ हजार रुपये परतावा दिला. मात्र, त्यानंतर विविध करणे सांगून परतावा दिला नाही. दरम्यान, अशाचप्रकारे इतर ठिकाणीही आरोपीने फसवणूक केल्याने या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला २०१८ मध्ये अटक झाली होती. आरोपी २०२१ पर्यंत कारागृहात होती. जामिनावर सुटल्यावर त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप रक्कम न मिळाल्याने अखेर तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com