Sat, April 1, 2023

कालेच्या उपसरपंचपदी रंजना कालेकर
कालेच्या उपसरपंचपदी रंजना कालेकर
Published on : 13 February 2023, 8:00 am
पवनानगर, ता. १३ ः काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना दत्तात्रेय कालेकर यांची निवड करण्यात आली. आशा कालेकर यांनी ठरलेल्या मुदतीत पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. सरपंच खंडुजी कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. रंजना कालेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक रवींद्र वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य अमित कुंभार, प्रवीण घरदाळे, उत्तम चव्हाण, रमेश कालेकर, छाया कालेकर, योगिता मोहोळ, दत्ता कालेकर, पप्पू शेडगे, बबन कालेकर, चंद्रकांत आढाव, सचिन साबळे, गोविंद कालेकर, दत्ता कालेकर पाटील, संतोष राऊत, स्वप्नील सावंत, शरद कालेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.