‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमास सुरुवात

‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमास सुरुवात

पवनानगर, ता. ६ ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांच्यासह सर्व शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते.

पर्यावरणाबाबतची जागृकता निर्माण होण्यासाठी संस्था यावर्षी सर्व शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना प्रत्येक एक झाड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ते झाड आपल्या घराच्या अंगणात, शेतात अथवा आपल्या शाळेत लावावे व त्याचे वृक्षसंवर्धन वर्षभर करावे. वर्ष अखेरीस संस्थेच्यावतीने विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलातील सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, ‘‘पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी संस्थेतील वृक्षसंवर्धन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.’’ सोनबा गोपाळे म्हणाले की, ‘‘शालेय जीवनापासूनच पर्यावरण रक्षण संवर्धन विद्यार्थ्यांवर होण्यासाठी संस्थेच्यावतीने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.’’

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे या संस्थेने ‘कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी’ हा पर्यावरण पूरक उपक्रम मागील शैक्षणिक वर्षापासून सुरु केला आहे. यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे तसेच मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या सामाजिक शैक्षणिक व सहकार संस्थांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com