पवन मावळातील भात पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता
पवनानगर, ता.२७ : गेल्या तीन ते चार दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे भात पेरणी देखील लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
मावळ तालुक्यात मुख्य पीक हे भात आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भात पेरण्याची परंपरा आता कमी झाली आहे. मृग नक्षत्रात करावयाच्या पेरणीसाठी शेतीपूर्व मशागतींच्या कामांना काही भागांत सुरुवात झाली होती. जेथे बागायती शेती केली जाते. त्या ठिकाणचे शेतीतील पीकच अजून निघाले नव्हते. तर काही ठिकाणी पावसामुळे सवडच न मिळाल्याने खरीप पूर्व मशागत रखडली आहे. काही शेतकऱ्यांची शेतीची नांगरणी देखील झालेली नाही.
मुसळधार पाऊसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी तुंबले आहे.
पवनानगर वसाहातीत काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. पवनानगर चौकात नैसर्गिक ओढ्यांवर मोठी अनधिकृत बांधकामे झाली असल्याने ओढ्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यावेळी पाणी सखल भागांतील घरांमध्ये घुसले. त्यामुळे नागरिकांची मोठी दैना उडाली. पवना शाळेतील कार्यालयामध्ये देखील पाणी घुसले. परंतु कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. कर्मचाऱ्यांनी त्वरित पाणी बाहेर काढले.
PVN25B02174
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

