पवनानगरमध्ये गणवेश वाटप, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम
पवनानगर, ता. १६ ः पवनानगर परिसरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त गणवेश वाटप, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पवना शिक्षण संकुलात उद्योजक अतुल लक्ष्मण कालेकर यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन झाले. वेंकीज कंपनीचे व्यवस्थापक तसेच शाळेचे माजी विद्यार्थी विलास वाघमारे व अतुल गांधी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर माजी उपसरपंच अमित कुंभार, छाया कालेकर, फुलाबाई कालेकर, पोलिस पाटील सीमा यादव, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका शीतल शेटे, ग्रामसेवक शशिकिरण जाधव, माजी उपसरपंच अनिल भालेराव, नितीन बुटाला, सचिन मोहिते, किशोर शिर्के, शुभम कालेकर, हनुमंत राऊत, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते. यावेळी काले गावचे युवा उद्योजक अतुल कालेकर यांच्यातर्फे संकुलातील ७० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
संकल्प इंग्लिश स्कूल आणि पवना विद्या मंदिर या शाळांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रभात फेरी काढून जनजागृती केली. संकल्प स्कूलचे ध्वजवंदन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक लक्ष्मण भालेराव यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पोपटशेठ कालेकर, संचालक डॉ. संजय चौधरी, संचालिका विद्या गांधी, कांचन भालेराव, कविता कालेकर, मुख्याध्यापक राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.
येथील तलाठी कार्यालयात मंडलाधिकारी सचिन कोकाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी खंडू कालेकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजवंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ कालेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याध्यापिका किरण लाहूडकर, नागनाथ चामे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, पालक उपस्थित होते. पवना कृषक विकास सहकारी संस्थेचे ध्वजवंदन अध्यक्ष भाऊ सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी धोंडू कालेकर, बबनराव दहिभाते, केदारी बाबा, विजय भालेराव आदी उपस्थित होते.
पवना पाटबंधारे विभागाचे ध्वजवंदन शाखाधिकारी रूपेश गावित यांच्या हस्ते झाले. पवना जलविद्युत निर्मिती केंद्रात अतिरिक्त कार्यकारी अभियंता माया कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी एस. टी. होरने, मनोज चव्हाण आदींसह कर्मचारी उपस्थित होते. काले पवनानगर ग्रामपंचायतीच्या ग्राम सचिवालयात सध्या प्रशासक असल्यामुळे येथील ग्रामसेवक शशिकिरण जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
---
किल्ल्यांवरही ध्वजवंदन
ऐतिहासिक किल्ल्यांवर ध्वजवंदन झाले. तिकोना किल्ल्यावर गाव कामगार तलाठी अमोल कल्पे, लोहगडावर तलाठी आरगडे, विसापूरला कुरुंज ग्राममहसूल अधिकारी बसवेश्वर क्षिरसागर व कालेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल हजगुडे, तर तुंग येथे तलाठी राहुल डोळस, जगन्नाथ दळवी यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.