पिंपरी-चिंचवड
पवनानगर परिसरात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप
पवनानगर ता.२८ : पवनानगर परिसरात गणरायाचे आनंद आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. येधील गावात काही घरामध्ये दीड दिवसासाठी गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. गुरुवारी काही गावामध्ये गणरायाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ ‘गणपती गेले गावाला चैन पडेना जिवाला’ या घोषात मिरवणुक दुमदुमली होती. महिलांनी फेर धरुन गौरीची गाणी म्हटली यामुळे वातावरण मंगलमय झाले होते.
ठाकूरसाई, काले, पवनानगर, ब्राम्हणोली या गावातील नागरिकांनी पवना धरणाच्या काठावर गणपतीचे विसर्जन केले. तर कोथुर्णे, येळसे, शिवली,
या गावातील नागरिकांनी पवना नदीच्या तीरावर विसर्जन केले. परिसरातील अनेक गावामध्ये ढोल लेझीम पथके आहेत. या पथकांना पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण या भागातून गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते.