सडवलीचा प्रतीक देशमुख युवा महाराष्ट्र केसरी
पवनानगर, ता. २५ : मावळ तालुक्यातील सडवली गावचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता प्रतीक शंकर देशमुख याने २० वर्षांखालील गटाच्या राज्य ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत १३० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. याबरोबरच त्याने ‘युवा महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. शिवली गावचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वैष्णव नारायण आडकर याने ७७ किलो वजनी गटात ब्राँझ मिळविले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर तालीम संघातर्फे नारायणगावमध्ये ही स्पर्धा नुकतीच ढाली. प्रतिकने सोलापूरच्या रामेश्वर येलगू व रायगडच्या वेदांत म्हात्रे यांना चितपटीने करून उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर त्याने पुण्याच्या आदेश डुबेला ८-० अशा गुणाधिक्याने हरविले. अंतिम फेरीत त्याने सांगलीच्या विश्वजीत पाटीलचा ८-० असा पराभव केला.
प्रतीक आणि वैष्णव पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पटारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. या यशाबद्दल ऑलिंपियन मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव मारुती बहिरू आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खंडू वाळूंज, कुस्तीगीर संघाचे सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर बंडू येवले, सहसचिव व महाराष्ट्र विजेते पप्पू कालेकर, उपाध्यक्ष व विद्यापीठ विजेते सचिन घोटकुले, मनोज येवले, महाराष्ट्र विजेते तानाजी कारके, विष्णू शिरसाट, राष्ट्रीय कुस्तीगीर . निवृत्ती काकडे, भरत लिम्हण, कार्याध्यक्ष महाराष्ट्र विजेते नागेश राक्षे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रतिकचा ग्रामस्थांनी सत्कार आयोजित केला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

