पवना कृषक संस्थेवर
काळे, आढाव संचालक

पवना कृषक संस्थेवर काळे, आढाव संचालक

Published on

पवनानगर, ता. २५ : पवना कृषक संस्थेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मधुकर काळे व भगवान आढाव यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. आधीचे संचालक अपात्र ठरल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यावर निष्ठावंतांना संधी मिळाली.
मावळ तालुक्यातील ४० गावांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि एक सर्वात जुनी संस्था मानली जाते. त्यावर भाजपने वर्चस्व राखले. या संस्थेत भाजपचे ९, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ संचालक अशी स्थिती होती. नुकतेच निवडून आलेले संस्थेचे उपाध्यक्ष गणपत घारे व किसन घरदाळे यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद ठरले. रिक्त जागांसाठी वडगाव येथे संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
दोन जागांसाठी केवळ काळे व आढाव यांचेच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी व सहाय्यक अधिकारी विजय कालेकर यांनी ही बिनविरोध निवडीची घोषणा केली. यामुळे संस्थेवरील भाजपची पकड अधिक मजबूत झाली.
या निवडीबद्दल माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, ‘‘पक्षाने वर्षानुवर्षे निःस्वार्थपणे काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची निवड करून योग्य निर्णय घेतला आहे. अशा निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि संघटना अधिक सक्षम बनेल.’’
यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव आडकर, नामदेव पोटफोडे, उपाध्यक्ष बाळासाहेब आखाडे, बबन कालेकर, शत्रुघ्न धनवे, ज्ञानेश्वर आडकर, नंदू कालेकर, हिरामण आढाव, रामदास घरदाळे, माजी सरपंच रमेश आडकर, धोंडिबा आडकर, माजी सरपंच भरत घारे, शिवली चेअरमन शरद घारे, पोलिस पाटील तानाजी काळे, उपसरपंच बाळासाहेब काळे, काले सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊ कालेकर, किसन काळे, भरत नामदेव काळे, शांताराम मोरे, तुंगचे पोलिस पाटील गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे सर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालक धोंडू कालेकर, बबन दहिभाते, अंकुश पडवळ, शेखर दळवी, अंकुश सोनवणे, लक्ष्मीबाई आडकर, तज्ज्ञ संचालक प्रभाकर वाघोले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com