पवनानगर बाजारपेठ बंद; दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली
पवनानगर, ता. २९ ः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळ विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार रूपलेखा ढोरे यांच्या निधनामुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय नेतृत्व हरपल्याने मावळवासीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या पार्श्वभूमीवर पवनानगर येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने दोन्ही दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी आज ‘मावळ बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पवनानगर बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्गाने आपली दुकाने व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. सकाळपासूनच पवनानगर बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णतः ठप्प होते. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने बंद पाळून दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण केली.
पवनानगर येथील मुख्य चौकात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष तसेच इतर सर्व पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजित पवार यांच्या तडफदार, प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्वाची आठवण करून दिली. तसेच मावळच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीत माजी आमदार रूपलेखा ढोरे यांनी दिलेल्या योगदानालाही श्रद्धेने उजाळा देण्यात आला.
या श्रद्धांजली सभेत दोन्ही नेत्यांच्या कार्याची आठवण सांगताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. मावळ तालुक्याने दोन महत्त्वाचे नेतृत्व एकाच वेळी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

