पिंपरी चिंचवड महानगरपालिका – प्रभाग क्र. १७
प्रभाग १७ ः दळवीनगर- बिजलीनगर
बदलत्या समीकरणांचा केंद्रबिंदू
- संजय चव्हाण
प्र भाग १७ दाट लोकवस्तीचा आहे. कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा मोठा वावर आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील नागरिक वास्तव्यास असल्याने प्रभागाच्या सामाजिक रचनेत वैविध्य आले आहे. त्यामुळे हा भाग राजकीयदृष्ट्या नेहमीच उत्सुकतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने चारही जागांवर एकहाती यश मिळवला. आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. नागरिकांना अपेक्षित कामे झालेली नसल्याची भावना निर्माण झाली आहे. 
समाविष्ट भाग 
बिजलीनगर, उद्योगनगरी, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, वाल्हेकरवाडी गावठाण, गिरिराज सोसायटी, चिंचवडेनगर, रेल्वे विहार, भोईरनगर, शिवनगरी, नागसेननगर, आहेरनगर, बळवंतनगर आदी 
पक्षीय स्थिती 
- महायुती न झाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच खरी लढत 
- भाजपकडून स्थानिक पातळीवर पुन्हा संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न 
- राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तयारी
- शिवसेना इच्छुकांकडूनही मोट बांधण्याचे काम
दृष्टिक्षेप
- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यावर इच्छुकांचा भर
- युती न झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून स्वतंत्र लढत 
- मतदारांची राजकीय निष्ठा बदलत असून, स्थानिक नेतृत्वावर निकाल ठरण्याची शक्यता 
- विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव राहिला; तर भाजप पुन्हा एकदा आपली पकड कायम ठेवू शकतो
प्रचाराचे संभाव्य मुद्दे
- पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी
- कचरा व्यवस्थापन, खेळाचे मैदान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

