रावेत, वाल्हेकरवाडीत घरोघरी प्रचाराला वेग
रावेत, ता.१० : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेतमधील प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मध्ये सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या काही दिवसांत घरोघर प्रचारावर विशेष भर दिला आहे. निवडणुकीपूर्वीचे हे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून प्रत्येक मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा जोर दिसून येत आहे.
प्रभाग १६ व १७ मध्ये बहुपक्षीय लढत असल्यामुळे प्रत्येक मताला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र झाला असून, मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. या दोन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्या गृहप्रकल्प, गृहनिर्माण सोसायट्या आणि वाढती लोकसंख्या आहे. त्यामुळे पारंपरिक सभा, रोड शोपेक्षा थेट घराघरांत जाऊन संवाद साधणे अधिक परिणामकारक ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उमेदवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोसायट्या, चाळी, वसाहती आणि दुकाने भेट देत मतदारांच्या समस्या ऐकत आहेत.
प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, भटक्या श्वानांचा प्रश्न आणि सुरक्षेचे मुद्दे नागरिक मोठ्या प्रमाणात मांडत आहेत. उमेदवार आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासने सांगून या प्रश्नांवर तोडगा काढण्याची ग्वाही देत आहेत. पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे. जे उमेदवार ठोस उत्तर देत आहेत त्यांनाच मत देण्याचा आमचा विचार असल्याचे एका महिला मतदाराने सांगितले.
सोसायटीनिहाय प्रचार
डिजीटल प्रचारासोबतच प्रत्यक्ष भेटीचा प्रभाव अधिक असल्याचे उमेदवारांनाही जाणवत आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप, सोशल मीडिया यासोबतच घराघरांत जाऊन पॅम्प्लेट वाटप, वैयक्तिक संवाद आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा यावर भर दिला जात आहे. काही उमेदवारांनी स्वयंसेवकांची स्वतंत्र गट तयार करून सोसायटीनिहाय प्रचाराची आखणी केली आहे.
‘‘नेते घरापर्यंत येऊन आमच्या अडचणी ऐकत आहेत, ही चांगली बाब आहे. फक्त निवडणुकीपुरते नव्हे, तर नंतरही त्यांनी असेच संपर्कात राहावे.’’
- सुनील पवार, रहिवासी, रावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

