पिंपरी-चिंचवड
आकुर्डीत रक्तदान शिबिर
आकुर्डी, ता.२० : लातूर जिल्हा मित्र मंडळ, रावेत-आकुर्डी, पुणे यांच्यावतीने ४१ वे भव्य वार्षिक रक्तदान शिबिर आकुर्डी प्राधिकरणातील जयहिंद चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. उद्योजक लक्ष्मीकांत कोल्हे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी उद्योजक बाबूराव सगावकर हे होते. तर उद्योजक अजय मुंगडे, प्रा. रामदास बिरादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एकूण १०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गुंजोटे, संगनाथ राऊत, राहुल देशमुख, औदुंबर नाईक, भास्कर जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमोद गंगापुरे, मयूर कुमदाळे, प्रशांत गुंजोटे, महेश राऊत आदींचे सहकार्य लाभले.

