रावेत, आकुर्डी भागांत पदपथांवर अतिक्रमणे
रावेत, ता.३१ : रावेत आणि आकुर्डी परिसरातील पदपथ आणि सायकल मार्गावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. फेरीवाले, तात्पुरती दुकाने, बांधकाम साहित्य, दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहिल्याने पादचारी तसेच सायकलस्वारांची राखीव जागा अक्षरशः बंद झाली आहे. परिणामी, नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणारी मुले, कार्यालयीन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. काही ठिकाणी पदपथ इतका अडवलेला असतो की दोन माणसे एकाच वेळी चालू शकत नाहीत. सायकल मार्गावर दुकानदारांचे गाडे लावले जात असल्याने सायकलस्वारांना वाहतुकीत मिसळावे लागत आहे. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजाराम सरगर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांसाठी असतो. पण इथे गाड्या, भाजीवाले आणि साहित्य पडलेले असते. आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते आणि त्यामुळे अपघाताची भीती सतत वाटते.
- नितीन पाटील, रहिवासी, रावेत
लहान मुलांना शाळेत सोडायला जाताना फार काळजी घ्यावी लागते. सायकल ट्रॅकवरच दुकाने असल्याने सायकल चालवणे धोकादायक झाले आहे.
- सुजाता कुलकर्णी, आकुर्डी
RVT26A00295
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

