आकुर्डीतील ‘फूडपार्क’ अखेर सुरू; खवय्यांना पर्वणी !
आकुर्डी, ता.१२ ः पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातील ‘फूडपार्क’साठी बांधलेल्या ५० दुकानांपैकी ३५ दुकाने भाडेकरारावर महिला बचत गटांतर्फे अखेर सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित १५ दुकाने लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले असून खवय्यांना देखील चांगली पर्वणी उपलब्ध झाली आहे.
साधारणतः दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या ‘फूडपार्क’चे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात दुकाने वापरात न आल्याने संपूर्ण परिसर धूळखात पडला होता.
काही किरकोळ काम राहिल्याने उर्वरित दुकाने सुरू करण्यात उशीर होत आहे. मात्र, ती देखील लवकरच सुरू होतील, अशी ग्वाही महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
‘फूडपार्क’वर एक नजर
- स्वच्छ, सुरक्षित खाद्यपदार्थाबरोबरच स्थानिकांना व्यवसायाची संधी देण्याचा उद्देश
- ई लिलावाद्वारे दुकानांसाठी १५ ते ३० हजार रुपयांचे भाडेकरार
- तीन-चार रंगीत पट्ट्यांनी दुकानांची सजावट
- एकसंध रचना, सुंदर बाग व बसण्यासाठी बाके
- काही ठिकाणी झाडांची निगा, महिला स्वच्छतागृहाचा अभाव
- परिसराची देखभाल दुर्लक्षित, पार्किंगचाही प्रश्न
महापालिकेने हे ‘फूडपार्क’ सुरू केल्याने हाताला काम मिळाले आहे. काही सोयी सुविधांचा अभाव आहे. त्या लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ग्राहक वाढण्यासाठी जाहिरात करणे आवश्यक आहे. महापालिकेने यासाठी सहकार्य करावे.
- पूनम मालव, सी-फूड स्टॉलचालक
गेल्या वर्षी ‘फूटपार्क’साठी निविदा काढली होती. ती पूर्ण झाल्याची माहिती आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या ताब्यात हे गाळे दिले आहेत. त्यांच्यामार्फत महिला बचत गटांचे नियोजन करण्यात आले आहे.
- सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी आणि जिंदगी विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
आकुर्डीतील ‘फूडपार्क’चे गाळे ई-लिलावाच्या माध्यमातून महिला बचत गटांना वितरीत करण्यात आले आहे. याशिवाय दिव्यांग कल्याण बचत गट आणि तृतीयपंथीयांना योग्य त्या भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. सर्व गाळे सुरळीत चालू असून तेथे अत्यावश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत.
- ममता शिंदे, समाज विकास अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
RVT26A00320
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

