आकुर्डीतील अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणांत वाढ

आकुर्डीतील अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणांत वाढ
Published on

रावेत, ता.२९ : खंडोबामाळ ते आकुर्डी रेल्वे स्थानक रस्ता, विठ्ठल मंदिर ते उर्सुला शाळेपर्यंतचा अंतर्गत रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. दुतर्फा अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या, बेकायदेशीर पार्किंग आणि काही ठिकाणी बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विठ्ठल मंदिरापासून ते उर्सुला शाळेपर्यंत अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या हातगाड्या, वाहनांमुळे एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्यावेळी परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि बाजारपेठांकडे जाणाऱ्या नागरिकांना दररोज उशीर होत असून वाहतुकीचा ताण वाढत आहे.

रस्त्यावर इतकी अतिक्रमणे झाली आहेत की चालत जाणेसुद्धा कठीण झाले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना नेहमीच कोंडीत अडकावे लागते. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करणे गरजेचे आहे.
- सुनील कदम, रहिवासी

दुकानांसमोर ग्राहकांची वाहने उभी राहतात. त्यातच हातगाड्या उभ्या असल्याने संपूर्ण रस्ता अडतो. वाहतूक कोंडीमुळे ग्राहकांनाही त्रास होतो आणि व्यवसायावर परिणाम होतो.
- पूजा शिंदे, नागरिक

क्लासला वेळेत पोहोचणे अवघड झाले आहे. अनेकदा वाहतुकीत १५ ते २० मिनिटे वाया जातात. पादचाऱ्यांसाठी पदपथच नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
- अमेय पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी


आम्हाला रस्ता ओलांडताना भीती वाटते. अतिक्रमणांमुळे वाहनचालकांना रस्ता अरुंद मिळतो आणि ते घाईघाईने वाहन चालवतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मंगला देशमुख, ज्येष्ठ नागरिक

मागण्या काय ?
- अतिक्रमणांविरोधी नियमित कारवाई
- बेकायदेशीर पार्किंगवर दंडात्मक कारवाई
- फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था
- गर्दीच्यावेळी वाहतूक पोलिसांची विशेष नेमणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com