रस्ते, भूखंड, वस्त्यांत सर्वत्र कचऱ्याचे ढीग

रस्ते, भूखंड, वस्त्यांत सर्वत्र कचऱ्याचे ढीग
Published on

रावेत, ता. ४ : रावेत परिसरात सध्या कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मुख्य रस्ते, रिकामे भूखंड आणि अंतर्गत वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रावेत गावठाण, शिंदे वस्ती, भोंडवे वस्ती आणि बीआरटीएस रस्ता परिसरात अनेक ठिकाणी कचरा पाहायला मिळत आहे. विशेषतः मुकाई चौक आणि एस. बी. पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रिकाम्या भूखंडांचा वापर नागरिक आणि काही व्यावसायिक कचरा टाकण्यासाठी करत आहेत. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिक नाइलाजास्तव रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. हा कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याने तो सडून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. भटके श्वान, मांजरे आणि डुकरांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी श्वानांच्या झुंडींमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत. डासांची पैदास वाढली असून डेंगी, हिवताप यांसारख्या आजारांची भीती रहिवाशांमध्ये पसरली आहे.

आमच्या सोसायटीच्या बाहेर गेल्या चार दिवसांपासून कचरा उचलला गेलेला नाही. उन्हाळ्यामुळे कचऱ्याचा वास थेट घरापर्यंत येतो. महापालिकेला वारंवार तक्रार करूनही फक्त आश्वासने मिळतात. आम्ही कर वेळेवर भरतो. मग साधी स्वच्छता का होत नाही ?
- अजित पाटील, रहिवासी, रावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com